Airtel यूजर्संसाठी आनंदाची बातमी, ६ जीबी डेटाचे कूपन फ्री, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः एअरटेल युजर्ससाठी सध्या कंपनीने एक खास ऑफरची घोषणा केली आहे. ज्यात प्रीपेड रिचार्ज प्लानवर ६ जीबी पर्यंत डेटाचे कूपन फ्री मध्ये मिळू शकते. या डेटामुळे मनोरंजन आणि आवश्यक काम तुम्ही करू शकता. एअरटेलचे ‘Free Data Coupons’मिळवण्यासाठी युजर्सला काही खास करावे लागत नाही. केवळ २१९ रुपयांच्या सुरुवातीच्या प्रीपेड रिचार्ज सोबत आणखी काही रिचार्जवर फ्री कूपन मिळू शकते. वाचाः युजर्संकडे हे मिळवण्याची संधी आहे. एअरटेलच्या या ऑफरसाठी काय काय करावे लागणार तसेच कोणत्या रिचार्जवर त्यांना हे फ्री कूपन मिळणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जाणून घ्या यासंबंधीची डिटेल्स माहिती. वाचाः या रिचार्जवर मिळणार लाभ एअरटेल युजर्संना जर २८ दिवसांची वैधता असलेला प्लान खरेदी करीत असेल तसेच तो प्ला अनलिमिटेड प्लान त्यावर त्यांना एक-एक जीबीचे दोन कूपन फ्री मिळते. या प्लानमध्ये २१९ रुपये, २४९ रुपये, २७९ रुपये, २८९ रुपये, २९८ रुपये, ३४९ रुपये, २९८ रुपये, आणि ४४८ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. जर युजर जर ५६ दिवसांच्या वैधतेचा प्लान रिचार्ज करीत असेल तर त्यांना एक एक जीबीचे ४ कूपन फ्री मिळते. या प्लानमध्ये ३९९ रुपये, ४४९ रुपये, ५५८ रुपये, आणि ५९९ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. म्हणजेच या प्लानमध्ये युजर्संना ४ जीबी पर्यंत डेटा फ्री मध्ये मिळू शकतो. जर एअरटेल युजर्संनी ८४ दिवसांची वैधता असलेला प्लान म्हणजेच ५९८ रुपये आणइ ६९८ रुपयांचा प्लान रिचार्ज केला तर त्यांना एक एक जीबीचे ६ डेटा कूपन फ्री मध्ये मिळेल. वाचाः युजर्संनी हे प्लान रिचार्ज केल्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये डेटा कूपन क्रेडिट होईल. एअरटेलची ही ऑफर घेण्यासाठी सर्वात मोठी अट म्हणजे युजर्संना Airtel Thanks मोबाइल अॅपवरून प्रीपेड रिचार्ज करावे लागणार आहे. यासाठी एअरटेल युजर्स एअरटेल थँक्स अॅप डाउनलोड करू शकतात. या अॅपच्या My Coupons सेक्शनमध्ये जाऊन युजर डेटा कूपनला रिडीम करू शकता. त्यात त्यांना कूपनच्या वैधतेसंबंधी माहिती होईल. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qmsFjS

Comments

clue frame