स्वस्त झाला 6000mAh बॅटरीचा Samsung Galaxy M21 स्मार्टफोन, पाहा नवी किंमत

नवी दिल्लीः जर तुम्हाला ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेराचा सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर सॅमसंगने आपल्या एका स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. Samsung Galaxy M21 स्मार्टफोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. या फोनच्या दोन्ही व्हॅरियंटची किंमत कमी करण्यात आली आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी, सह जबरदस्त फीचर्स आहेत. वाचाः ची किंमत मायस्मार्ट प्राइस रिपोर्टनुसार, दोन्ही व्हेरियंटच्या किंमतीत १ हजार रुपयांती कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन आता १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. परंतु, यात खास बाब म्हणजेच की कपात केवळ सध्या ऑफलाइन मार्केटपर्यंत मर्यादीत आहे. वाचाः Samsung Galaxy M21 च्या या फोनमध्ये ड्यूअल सिम (नॅनो) सोबत ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस (1080x2340 पिक्सल) इनफिनिटी-यू सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ३ चा वापर करण्यात आला आहे. या फोनमध्ये मल्टीटास्किंग साठी Exynos 9611 SoC ऑक्टा-कोर प्रोसेसर सोबत ग्राफिक्स साठी माली-जी72 MP3 दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते. वाचाः फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6,000 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bcRAzR

Comments

clue frame