नवी दिल्लीः in India: सॅमसंग ब्रँडच्या या मिड रेंज स्मार्टफोनला जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. मुंबईतील प्रसिद्ध रिटेलर महेश टेलिकॉम ने याबाबत माहिती ट्विटवरून दिली आहे. ट्विटच्या माहितीनुसार Galaxy A21sच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. वाचाः Samsung Galaxy A21sची किंमत सॅमसंग गॅलेक्सी ए २१ एस च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर हा फोन १३ हजार ९९९ रुपयांत तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. या दोन्ही फोनच्या नवीन किंमतीसोबत ई कॉमर्स साइट अॅमेझॉन वर लिस्ट करण्यात आले आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंट १४ हजार ९९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. वाचाः Samsung Galaxy A21s चे फीचर्स हा फोन अँड्रॉयड १० वर आधारित वन यूआय वर काम करतो. यात ६.५ इंचाचा एचडी प्लस (720X1,600 पिक्सल) इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला आहे. स्पीड आणि मल्टिटास्कींगसाठी एक्सीनॉस ८५० ऑक्टा कोर प्रोसेसर साठी ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्यच्या मदतीने स्टोरेज ५१२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. वाचाः फोनच्या मागे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा दोन कॅमेरा सेन्सर दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3afMeEG
Comments
Post a Comment