नवी दिल्लीः आणि Oppo Enco X ईयरबड्सची विक्री भारतात सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही डिव्हाइसेजला भारतात याचा आठवड्यात लाँच करण्यात आले होते. रेनो ५ प्रो ला क्वॉड कॅमेरा सेटअप आणि ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत लाँच करण्यात आले आहे. वाचाः Oppo Reno 5 Pro ला सिंगल ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी व्हेरियंटला देशात ३५ हजार ९९० रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ग्राहक या फोनला एस्ट्रल ब्लू आणि स्टारी ब्लॅक कलर या ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतील. याची विक्री फ्लिपकार्ट आणि देशातील प्रमुख रिटेल स्टोर्सद्वारे केली जात आहे. तर Oppo Enco X ईयरबड्सची किंमत ९ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे. याला ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येऊ शकते. वाचाः ऑफर्स ग्राहकांना एचडीएफसी बँक आणि आयसीआसीआय बँक कार्ड्सवर १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तसेच ग्राहकांना फेडरल बँक कार्ड्स आणि बँक ऑफ बडोदा कार्ड्सवर २५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकणार आहे. पेटीएमद्वारे फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या पेटीएम वॉलेट मध्ये ११ टक्के पेटीएम कॅशबॅक मिळणार आहे. ओप्पोकडून १२ महिन्यासाठी १२० जीबीची क्लाउड सर्विस दिली जाणार आहे. याच प्रकारे Oppo Enco X ईयरबड्ससाठी १ हजार रुपयांचे बंडलिंग ऑफर सुद्धा उपलब्ध आहे. वाचाः Oppo Reno 5 Pro स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी ओलेड डिस्प्ले, ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंस्ट्री १००० प्लस प्रोसेसर, ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप, ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, ६५ वॉट सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि फोनला पॉवर देण्यासाठी ४३५० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y0iPri
Comments
Post a Comment