OnePlus Buds Z चे स्पेशल एडिशन भारतात लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः वनप्लसने ग्राहकांसाठी भारतीय बाजारात Edition ला लाँच केले आहे. या लिमिटेड एडिशन इयरबड्सला लॉस एन्जेलिस बेस्ड आर्टिस्ट आणि डिझायनर Steven Harrington सोबत मिळून बनवण्यात आले आहे. याला टू टोन पर्पल आणि मिंट कलर ऑप्शनसोबत बाजारात उतरवले आहे. या लिमिटेड एडिशनचे हार्डवेयर रेग्युलर truly wireless (TWS) इयरबड्स सारखे आहे. वाचाः किंमत या लिमिटेड एडिशन इयरबड्सची भारतात किंमत ३ हजार ६९९ रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत साइट आणि वनप्लस स्टोर अॅप वर रेड केबल क्लब मेंबर्ससाठी हे इयरबड्स २६ जानेवारी रोजी रात्री ११.५९ पासून उपलब्ध केले जातील. अन्य ग्राहकांसाठी २७ जानेवारी पासून वनप्लसची साइट, वनप्लस स्टोर अॅप शिवाय अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वनप्लस ऑफलाइन स्टोर्सवर या लिमिटेड एडिशन इयरबड्सची ओपन सेल सुरू होणार आहे. वाचाः या लिमिटेड एडिशन इयरबड्स वनप्लस बड्स झेड समान आहेत. याचाच अर्थ या लेटेस्ट बड्स मध्ये ग्राहकांना बास बूस्ट टेक्नोलॉजी सोबत ११ एमएम डायनामिक ड्रायवर्स, डॉल्बी अॅटमॉस साउंडची सुविधा मिळणार आहे. वाचाः याशिवाय, हे लेटेस्ट बड्स स्वेट आणि वॉटर रेसिस्टेंटसाठी IP55 सर्टिफाइड आहे. या डिव्हाइसमध्ये ग्राहकांना ब्लूटूथ व्हर्जन ५, व्हाइस पिकअप साठी एनवारयरमेंटल नॉइस रिडक्शन, क्विक पेयर आणि क्विक स्विच सारखे जबरदस्त फीचर्स मिळतील. दावा केला जात आहे की, हे सिंगल चार्जवर २० तासांपर्यंत प्लेबॅक टाइम प्रदान करते. तसेच १० मिनिटाच्या क्वॉड चार्जवर हे ३ तासांपर्यंत प्लेबॅक टाइम ऑफर करते. वाचाः स्टँडर्ड OnePlus Buds Z आणि या लिमिटेड एडिशनमध्ये हे अंतर आहे की, नवीन डिव्हाइसमध्ये ग्राहकांना ऑल न्यू लूक मिळते. याशिवाय, इयरबड्सवर Steven Harrington कडून तयार करण्यात आलेली डिझाइन आणि कार्टून ची झलक पाहायला मिळते. याशिवाय, तुम्हाला आर्टिस्ट कडून डेवलप न्यू करेक्टर कूल कॅटची झलक इयरबड्सवर पाहता येऊ शकते. इयरबड्स शिवाय टो टोन पर्पल आणि मिंट कलर ऑप्शनची झलक पाहायला मिळते. तर स्टँडर्ड वनप्लस बड्स झेड ग्रे अँड व्हाइट कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y9CPHV

Comments

clue frame