JioPhone चे जबरदस्त प्लान, आता ७५ रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः JioPhone ला २०१७ मध्ये लाँच केले होते. यानंतर रिलायन्स जिओचे सब्सक्रायबर्स बेस वेगाने वाढला. २०१९ च्या अखेरपर्यंत जिओ फोन सब्सक्रायबर्स बेस ७ कोटीपर्यंत पोहोचला आहे. जिओ फोन युजर्सला इंडस्ट्रीमध्ये सर्वात स्वस्त (७५ रुपये) ४ जी टॅरिफ प्लान ऑफर करतात. वाचाः जिओ २८ दिवसांच्या वैधते सोबतचा प्लान ४९ रुपयांत जिओ फोन साठी ऑफर करीत होती. परंतु, नंतर कंपनीने याच्या किंमतीत वाढ केली आहे. आता या प्लानची सुरुवातीची किंमत ७५ रुपये आहे. आता इंटरकनेक्ट युजेस चार्ज संपल्याने जिओ फोन युजर्सला या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सुविधा मिळत आहे. वाचाः ७५ रुपयांचा जिओ फोन टॅरिफ प्लान जिओ फोन युजर्सला सध्या 'All in One' सेक्शन अंतर्गत अनलिमिटेड कॉम्बो प्लान ऑफर केले जात आहे. याची किंमत ७५ रुपयांपासून सुरू होऊन १८५ रुपयांपर्यंत जाते. ७५ रुपयांच्या जिओ प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात देशभर कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, १०० एमबी डेटा रोज आणि ५० एसएमएस ऑफर केले जातात. वाचाः याशिवाय या यादीत १२५ रुपयांचा प्लानचा समावेश आहे. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, ५०० एमबी डेटा रोज, ३०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता यात मिळते. १५५ रुपयांच्या जिओ फोन प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, १०० एसएमएस रोज मिळते. याची वैधता २८ दिवसाची आहे. तर १८५ रुपयांच्या जिओ फोन प्लानमध्ये २ जीबी डेटा रोज, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळते. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचे अॅक्सेस सुद्धा फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35sSJRI

Comments

clue frame