BSNL च्या 'या' प्लानमध्ये ८४ दिवसांपर्यंत रोज ५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः आपल्या ५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना रोज ५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसारखी सुविधा देत आहे. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. जिओ एअरटेल आणि वोडाफोन सारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तीन महिन्याच्या म्हणजेच ८४ दिवसांची वैधता असलेल्या प्लान पाहिल्यास या प्लानची किंमत ५९९ रुपये पासून ७९५ रुपयांपर्यंत आहे. ज्यात तुम्हाला १.५ जीबी ते २ जीबी डेटा मिळतो. परंतु, जर बीएसएनएलच्या STV599 प्लानमध्ये तुम्हाला ८४ दिवसांपर्यंत रोज ५ जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लानमध्ये अन्य बेनिफिट्स मिळतात. वाचाः वाचाः BSNL च्या या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता सोबत रोज ५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये युजर्संना एकूण ४२० जीबी डेटा मिळतो. डेटाशिवाय या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० फ्री एसएमएस ही सुविधा सुद्धा मिळते. वाचाः वाचाः BSNL च्या तुलनेत बाकी नेटवर्कमध्ये जिओ च्या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता असलेले दोन प्लान आहेत. एक ५५५ रुपयांचा आहे. ज्यात रोज १.५ जीबी डेटा मिळतो. तर ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. Airtel चा ५९८ रुपयांचा प्लान असून याची वैधता ८४ दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा मिळतो तर ६९८ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. वोडाफोन आयडियाचा ५९९ रुपयांचा रिचार्ज प्लान मध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. ६९९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात विकेंड डेटा रोलओवर प्लस डबल डेटा २ जीबी प्लस २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ४ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, वोडाफोन आयडियाच्या ७९५ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oYIYCK

Comments

clue frame