गुड न्यूज! १ फेब्रुवारीपासून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना BSNL ची 'ही' ऑफर

नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड ने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त डिस्काउंट ऑफर्सची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. बीएसएनएलने घोषणा केली आहे की, काही सर्विसमध्ये देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के सूट देणार आहे. म्हणजेच जर तुम्ही सरकारी नोकरी करीत असाल तर बीएसएनएलच्या काही सुविधामध्ये तुम्हाला १० टक्के सूट मिळणार आहे. बीएसएनएलने आपली बेस मजबूत करण्यासाठी ही जबरदस्त घोषणा केली आहे. १ फेब्रुवारीपासून देशभरातील सरकारी कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात. वाचाः निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ BSNL_Kolkata नावाच्या ट्विटर हँडलवरून कंपनीने या डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. याचा लाभ ची landline, broadband आणि fiber-to-the-home (FTTH) सर्विस घेणारे १ फेब्रुवारी २०२१ पासून लाभ मिळवू शकतात. बीएसएनएल याआधीही सरकारी कर्मचाऱ्यांना ५ टक्के डिस्काउंट देत होती. परंतु, आता यात वाढ करुन ते १० टक्के केले आहे. सध्या जे सरकारी नोकरी करीत असेल किंवा जे निवृत्त झाले असतील अशा दोन्ही कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळू शकते. प्रोमोशनल ऑफर्ससोबत नियम व अटी आधीच्या ज्या आहेत. त्याच राहतील. वाचाः गेल्या वर्षी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्यूनिकेशनने सर्व कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, आवश्यकतेनुसार, बीएसएनएल आणि एमटीएनएल पैकी कोणीही ब्रॉडबँड आणि लँडलाइन किंवा अन्य सर्विसचा लाभ घेऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल खासगी टेलिकॉम कंपन्यासोबत जबरदस्त स्पर्धा करीत आहे. वाचाः BSNL चा खास प्लान बीएसएनएलने १८ जानेवारी पासून BSNL broadband आणि Bharat Fiber कस्टमर्ससाठी OTT Add on pack ची घोषणा केली आहे. यामुळे कंपनीला फायदा होताना दिसत आहे. Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea चे ग्राहक बीएसएनएलकडे येत असल्याचे दिसत आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38TZQou

Comments

clue frame