BSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये

नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या ग्राहकांसाठी ५९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळू शकतात. ८४ दिवस वैधता असलेल्या या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा प्लान एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया तसेच जिओ प्लानपेक्षा थोडा वेगळा आहे. वाचाः बीएसएनएलचा ५९९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये २ जी आणि ३ जी डेटा नेटवर्कचा वापर केला जावू शकतो. याशिवाय, ४जी नेटवर्क मध्ये डेटा चा वापर केला जावू शकतो. नेटवर्कमध्ये केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाना, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश यासारख्या काही निवडक क्षेत्रात ४ जी नेटवर्कची सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, ४जी नेटवर्क केवळ काही ठिकाणी मिळते. वाचाः बीएसएनएलच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ५ जीबी डेटा दिला जातो. ८४ दिवसांच्या वैधतेसोबत एकूण ४२० जीबी डेटा मिळतो. तर व्हॉइस कॉलिंगमध्ये अनलिमिटेड मिळते. याशिवाय १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये जिंग अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. याची वैधता २८ जानेवारी २०२१ पर्यंत आहे. वाचाः जिओचा ५९९ रुपयांच्या किंमतीच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस मिळते. याशिवाय, जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते. ८३ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. वाचाः वोडाफोन आयडियाचा ५९९ रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते. याशिवाय, वोडाफोन-आयडिया मूव्हीज आणि टीव्ही अॅक्सेस मिळते. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये एकूण १२६ जीबी डेटा मिळतो. एअरटेलच्या ५९८ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठण्याची सुविधा मिळते. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये एकूण १२६ जीबी डेटा मिळतो. एकूण बीएसएनएलचा हा प्लान एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि जिओ प्लानच्या तुलनेत जास्त डेटा देणारा प्लान आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38KDpSK

Comments

clue frame