नवी दिल्लीः भारतात सर्वात स्वस्त ५जी मोबाइल Motorola Moto G 5G लाँच करण्यात आल्यानंतर स्मार्टफोन कंपनी लवकरच भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये ४ रियर कॅमेरे आणि दोन सेल्फी कॅमेरे, मोठी बॅटरी, हाय डिस्प्ले रिफ्रेश रेट सोबत पॉवरफुल प्रोसेसर असणार आहे. या फोनची नुकतीच एक झलक दिसली आहे. यावरून या फोनचा लूक जबरदस्त दिसत आहे. वाचाः मोटोरोला नियो (कोडनेम) मध्ये ६४ मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा असणार आहे. तसेच यात अनेक जबरदस्त फीचर्स असणार आहेत. Voice वर पब्लिश Nils Ahrensmeier (@NilsAhrDE) च्या फोटोनुसार, Motorola Nio ला Sky कलर ऑप्शन सोबत Beryl वेरियंट मध्ये लाँच करण्यात येणार आहे. वाचाः डिझाइन मोटोरोला नियोच्या राइट साइड व्हॅल्यूम बटन आणि पॉवर बटन सोबत फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा असणार आहे. या फोनमध्ये ऑडियो झूम फीचर असू शकते. सध्या सॅमसंगसह अन्य कंपन्याच्या फ्लॅगशीप स्मार्टफोनमध्ये हे फीचर पाहायला मिळते. लीक झालेल्या माहितीनुसार, मोटोरोलाच्या या फोनला Motorola Edge S नावाने सुद्धा लाँच केले जाऊ शकते. वाचाः Motorola Nio चे खास फीचर्स या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. याचे रिझॉल्यूशन 1080x2520 पिक्सल असणार आहे. हा फोन अँड्रॉयड ११ वर काम करू शकतो. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन Qualcomm Snapdragon 865 SoC प्रोसेसर असणार आहे. कंपनी या फोनला 105Hz डिस्प्ले रिफ्रेश रेट सोबत लाँच करु शकते. मोटोरोलाच्या या फोनला ८ जीबी रॅम आणि १२ जीबी रॅम ऑप्शन सोबत लाँच केले जाऊ शकते. या फोनमध्ये दोन सेल्फी कॅमेरे असतील. लेफ्ट साइडला पंच होल मोड आणि क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात प्रायमरी सेन्सर ६४ मेगापिक्सलचा आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35QZNYL
Comments
Post a Comment