उद्यापासून पबजी चॅम्पियनशीप, १६ टीमचा सहभाग, ८.७८ कोटीचे बक्षीस

नवी दिल्लीः उद्यापासून सुरू होणार आहे. भारतात पबजीला बंदी असली तरी पबजी लाँचिंगची चाहत्यांना फार उत्सूकता आहे. लवकरच रिलाँच होणार आहे. त्याआधीच २१ ते २४ जानेवारी दरम्यान Global Championship (PMGC) 2020 चे सामने खेळवले जाणार आहे. वाचाः या चॅम्पियनशीपमध्ये १६ टीम सहभागी होणार आहे. विजेत्याला १.२ मिलियन डॉलर म्हणजेच ८.७८ कोटी रुपयांचे बक्षीस वाटप केले जाणार आहे. सध्या करोना असल्याने लोक घरी बसून हे सामने पाहू शकणार आहेत. भारतात ही चॅम्पियनशीपला PUBG Mobile Esports, Facebook, YouTube आणि Twitch चॅनेलवर पाहता येऊ शकते. PMGC 2020 ची लाइव स्ट्रीमिंग भारतात २१ पासून २४ जानेवारी दरम्यान रोज सायंकाळी ५.३० वाजता सुरू होणार आहे. याला हिंदी सोबत इंग्लिश, नेपाळी, थाय भाषेत कमेंट्री ऐकायला मिळू शकते. २१ जानेवारी रोजी टूर्नामेंटची सुरुवात सायंकाळी ४ वाजेपासून होणार आहे. वाचाः या १६ टीमचा सहभाग पबजी मोबाइल ग्लोबल चॅम्पियनशिप 2020 मध्ये १६ टीम शॉर्टलिस्ट झाली आहे. गेल्या वर्षी क्वॉलिफाइंग राउंड क्लियर करुन १६ टीम जागा बनवण्यात यशस्वी ठरली होती. २१ ते २४ जानेवारी दर्याने या १६ टीम २४ सामने खेळतील. हे सामने Erangel, Miramar, Sanhok आणि Vikendi यासारख्या पबजी मोबाइल अॅपमध्ये खेळता येतील. यावर्षी पबजी ग्लोबल टूर्नामेंट मध्ये सहभागी होणाऱ्या संघामध्ये Four Angry Men, Konina Power, Bigetron Red Aliens, RRQ Athena, Nova XQF, Klas Digital Athletics, Secret Jin, Futbolist, Power888 KPS, Abrupt Slayers, Alpha7 Esports, Z3US Esports, Natus Vincere, Aerowolf Limax, Team Secret आणि A1 Esports चा समावेश आहे. वाचाः पॉइंट टेबल PUBG Mobile Global Championship (PMGC) 2020 मध्ये एकूण २४ सामन्यात जो पहिला असेल त्याला १५ पॉइंट्स मिळतील. तर, दुसऱ्या स्थानावर असलेल्या टीमला १२ पॉइंट्स मिळतील. तिसऱ्या टीमला १० पॉइंट्स मिळतील, चौथ्याला ८, पाचव्याला ६, सातव्याला ४ आणि आठव्या ते बाराव्या स्थानावर असलेल्या टीमला १-१ पॉइंट मिळेल. या टूर्नामेंटमध्ये जी टीम १३ व्या स्थानापासून १६ व्या स्थानावर असेल त्यांना एकही पॉइंट मिळणार नाही. वाचाः कोणाला किती पैसे मिळणार या चॅम्पियनशीपमध्ये एकूण ८.७८ कोटी रुपयांचे बक्षीस वाटले जाणार आहे. यात पहिल्या स्थानावर असलेल्या टीमला सर्वात जास्त पैसे मिळतील. ७ लाख डॉलर म्हणजेच ५.१२ कोटी रुपये मिळतील. तर दुसऱ्या स्थानावर १.४६ कोटी रुपये तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या विजेत्या टीमला ७३.२ लाख रुपये मिळतील. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3szEHYy

Comments

clue frame