रिलायन्स जिओः टॉप-अप वाउचर्स, १० रुपयांपासून सुरुवात, हे बेनिफिट्स मिळते

नवी दिल्लीः Reliance Jio केवळ प्रीपेड पॅक, पोस्टपडे प्लान आणि डेटा प्लान ऑफर करीत नाहीत तर कंपनीकडे टॉप अप वाउचर सुद्धा आहेत. देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना टॉक टाइम साठी ६ टॉप अप वाउचरचा ऑप्शन देते. या वाउचरची सुरुवात १० रुपयांपासून होते. टॉप अप वाउचरची जास्तीत जास्त किंमत १ हजार रुपये आहे. जाणून घ्या रिलायन्स जिओच्या या टॉप अप वाउचरसंबंधी सर्वकाही. वाचाः १० रुपयांचा जिओ टॉप अप वाउचर रिलायन्स जिओच्या १० रुपयांच्या टॉप अप वाउचरमध्ये ७.४७ रुपयांचा टॉक टाइम मिळतो. या टॉपची वैधता अनलिमिटेड आहे. २० रुपयांचा जिओ टॉप अप वाउचर या वाउचरमध्ये १४.९५ रुपयांचा टॉक टाइम मिळतो. याची वैधता सुद्धा अनलिमिटेड आहे. ५० रुपयांचा जिओ टॉप अप वाउचर या वाउचरमध्ये ३९.३७ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. या वाउचरमध्ये सुद्धा अनलिमिटेड कॉलिंग सोबत मिळते. १०० रुपयांचा टॉप अप वाउचर या वाउचरमध्ये ८१.७५ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. वाउचरची वैधता अनलिमिटेड आहे. ५०० रुपयांचा जिओ टॉप अप वाउचर या टॉप अप वाउचरमध्ये ४२०.७३ रुपयांचा टॉक टाइम ऑफर केला जात आहे. याची वैधता सुद्धा अनलिमिटेड आहे. १ हजार रुपयांचा जिओ टॉप अप वाउचर या टॉप अप वाउचरमध्ये ८४४.४६ रुपयांचा टॉक टाइम मिळतो. याची वैधता अनलिमिटेड आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3t3NpOX

Comments

clue frame