नवी दिल्लीः विवोने बजेट सेगमेंटमध्ये एक जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनची फीचर्स कमाल आहेत. Vivo Y Series च्या या फोनच्या 3GB RAM + 64 GB स्टोरेजची किंमत भारतात ११ हजार ४९० रुपये आहे. विवोची वाय सीरीजचे मोबाइल्स भारतात खूप प्रसिद्ध आहेत. Vivo Y20A ला Nebula Blue आणि Dawn White या कलरमध्ये लाँच केले आहे. २ जानेवारीपासून या फोनची ऑनलाइन तसेच ऑफलाइन विक्री सुरू करण्यात येणार आहे. वाचाः Vivo Y20A ची फीचर्स अँड्रॉयड 11 FunTouch OS 11 वर बेस्ड असलेल्या या फोनमध्ये ६.५१ इंचाचा एचडी प्लस दिला आहे. याची स्क्रीन रिजॉल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. फोनमध्ये Snapdragon 439 SoC प्रोसेसर दिला आहे. या फोनला ३ जीबी रॅम सोबत लाँच केले आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. या फोनमध्ये Bluetooth 4.2, GPS, FM Radio आणि यूएसबी पोर्ट सह अनेक फीचर्स दिले आहेत. वाचाः कॅमेरा आणि बॅटरी विवोच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहो. विवोचा दावा आहे की, सिंगल चार्जवर १७ तासांपर्यंत चित्रपट पाहिले जावू शकते. तसेच १० तासांपर्यंत गेम खेळता येवू शकतो. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सलचा लेन्स आणि तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. विवोच्या या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34YHIYd
Comments
Post a Comment