नवी दिल्लीः Reliance Jio युजर्ससाठी अनेक बेस्ट प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. जिओला सुरुवातीपासूनच कमी किंमतीत जास्त बेनिफिट देणारी टेलिकॉम ऑपरेटर ओळखले जात आहे. कंपनी आपली ही इमेज कायम राखण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जिओकडे२०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त प्लान उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये ४२ जीबी पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग सोबत अतिरिक्त बेनिफिट दिले जाते. वाचाः जिओचा १४९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये रोज १ जीबी प्रमाणे एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. २४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये ३०० नॉन जिओ एफयूपी मिनिट्स मिळते. १०० फ्री एसएमएस सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः जिओचा १९९ रुपयांचा प्लान २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी या प्रमाणे एकूण ४२ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग फायदा दिला जातो. दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १ हजार नॉन जिओ एफयूपी मिनिट मिळते. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस मिळते. वाचाः १५१ रुपये आणि २०१ रुपयांचा प्लान लॉकडाउन पीरियडमध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्या युजर्ससाठी कंपनीने काही प्लान लाँच केले आहेत. यात १५१ रुपये, २०१ रुपये आणि २५१ रुपयांचा प्लानचा समावेश आहे. हे प्लान केवळ डेटा ऑफर करीत आहेत. तिन्ही प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. १५१ रुपयांच्या प्लानमध्ये ३० जीबी डेटा, २०१ रुपयांच्या प्लानमध्ये ४० जीबी डेटा, २५१ रुपयांच्या प्लानमध्ये ५० जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये कंपनी फ्री कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देत नाही. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hnVvfX
Comments
Post a Comment