Reliance Jio च्या या प्लानमध्ये ३.५१ रुपयांत 1GB डेटा आणि फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने आपल्या युजर्संसाठी बेस्ट बेनिफिट्सच्या प्लान्सची मोठी लिस्ट बनवली आहे. या प्लानमध्ये डेली डेटा तसेच फ्री कॉलिंग सोबत अनेक अतिरिक्त बेनिफिट्स मिळते. युजर्संना सुद्धा अशाच प्लान्सची गरज असते. ज्या प्लानमध्ये कमी किंमतीत जास्त डेटा आणि फ्री कॉलिंगचा फायदा मिळायला हवा. त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक बेस्ट प्रीपेड प्लानसंबंधी माहिती देत आहोत. ज्यात तुम्हाला ३.५१ रुपयात १ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग सोबत Disney+ Hotstar VIP फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः या प्लानमध्ये ३.५१ रुपयात १जीबी डेटा रिलायन्स जिओचा २५९९ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला ३.५१ रुपयात १ जीबी डेटा मिळतो. ३६५ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ७४० जीबी डेटा मिळतो. प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १० जीबी बोनस डेटा दिला जातो. वाचाः फ्री कॉलिंग आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन कॉलिंगसाठी हा प्लान बेस्ट आहे. यात जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळते. दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १२ हजार एफयूपी मिनिट्स मिळते. रोज १०० फ्री एसएमएस मिळते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला एका वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते. वाचाः २३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३.२८ रुपयांत १ जीबी डेटा रिलायन्स जिओच्या २३९९ रुपयांचा एक प्लान आहे. यात १ जीबी डेटा ची किंमत ३.२८ रुपये आहे. या प्लानध्ये तुम्हाला २५९९ रुपयांच्या प्लानप्रमाणे १० जीबी फ्री डेटा मिळत नाही. तसेच या प्लानमध्ये कंपनी डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन देत नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oSr30a

Comments

clue frame