नवी दिल्लीः रियलमीने आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच केला आहे. एक्स ७ सीरीजचा हा फोन सध्या थायलँडमध्ये जवळपास ४२ हजार रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. आधी अशी माहिती समोर आली होती की, मध्ये आणि स्मार्टफोनला लाँच करणार आहे. परंतु, सध्या थायलँडमध्ये रियलमी एक्स ७ प्रोला विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. हा फोन Realme X7 सीरीजचा एकप्रकारे ग्लोबल लाँचिंग आहे. याला लवकरच भारतासह अन्य देशात लाँच करण्यात येणार आहे. वाचाः प्रीमियम स्मार्टफोन भारतात रियलमीच्या या फोनच्या विक्रीची उत्सूकता आहे. गेल्या एक वर्षापासून भारतात आपला स्मार्टफोन, स्मार्ट वियरेबल आणि इयरबड्स -ईयरफोन्सची बंपर विक्री केली जात आहे. त्यामुळे प्रीमियम सेगमेंटमध्ये रियलमी एक्स ७ सीरीजला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. रियलमीच्या या फोनची टक्कर ओप्पो, वनप्लस, विवो आणि सॅमसंगसह अन्य कंपन्यांसोबत होईल. वाचाः फोनचे फीचर्स Realme X7 Pro 5G ला Black आणि Gradient कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. 8 GB RAM आणि128 GB स्टोरेज वेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या फोनमध्ये Dimensity 1000+ प्रोसेसर दिला आहे. ६.५५ इंचाचा अमोलेज डिस्प्ले दिला असून डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 हार्ट्ज आहे. या फोनमध्ये पॉवर देण्यसााठी 4500 mAh बॅटरी दिली आहे. ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः Realme X7 Pro मध्ये ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि २-२ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि डेप्थ सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये ३२ मेागपिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mBK0Tk
Comments
Post a Comment