नवी दिल्लीः ओप्पोने या महिन्याच्या सुरुवातीला Reno 5 आणि Reno 5 Pro ला चीनमध्ये लाँच केले होते. या इव्हेंटमध्ये कंपनीने कन्फर्म केले होते की, ते Pro+ फ्लॅगशीप स्मार्टफोनला चीनमध्ये २४ डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. या फोनला नुकतेच TENAA वर फुल फीचर्स सोबत पाहिले गेले होते. या लिस्टिंगनुसार, फोनच्या रियरमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. वाचाः Sony IMX766 सेंसरचा कॅमेरा फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. कंपनीने विबोवर कन्फर्म केले आहे. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, Oppo Reno5 Pro+ मध्ये Sony IMX766 सेंसरचा कॅमेरा दिला जाणार आहे. हा ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत येणारा जगातील पहिला स्मार्टफोन असणार आहे ज्यात Sony IMX766 सेंसरचा कॅमेरा दिला आहे. वाचाः कंपनीने शेयर केले पोस्टर कंपनीने या अपकमिंग स्मार्टफोनचे एक पोस्टर शेयर केले आहे. या पोस्टरमध्ये फोनला मॅट फिनिश आणि डिझाइन सोबत पाहिले जावू शकते. यासोबतच बॅक पॅनेलवर एक चार रियर कॅमेरा पाहायला मिळू शकतात. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला जावू शकतो. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जावू शकतो. वाचाः १२ जीबी रॅम आणि ६५ वॉट फास्ट चार्जिंग फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबीचे इंटरनल स्टोरेज मिळू शकते. प्रोसेसर म्हणून यात स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट दिला आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी मिळू शकते. ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असून या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले पंच होल डिझाइन आणि 90Hz चे रिफ्रेश रेट सोबत येईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mGKTKa
Comments
Post a Comment