ओप्पोचा नवा स्मार्टफोन OPPO A15s ची विक्री सुरू, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः ओप्पो इंडियाचा नवीन स्मार्टफोन ची विक्री सुरू करण्यात आली आहे. ओप्पोने OPPO A15s ला गेल्या आठवड्यात लाँच केले होते. ओप्पोचा हा नवीन फोन OPPO A15 चे अपग्रेड व्हर्जन आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज सोबत लाँच केले आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत ३डी कर्व्ड बॉडी दिली आहे. वाचाः OPPO A15s ची किंमत OPPO A15s ची विक्री डायनेमिक ब्लॅक, फॅन्सी व्हाइट आणि रँबो सिल्वर कलरमध्ये अॅमेझॉन इंडिया आणि रिटेल स्टोरवर होत आहे. फोनची किंमत ११ हजार ४९० रुपये आहे. आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँकच्या कार्डवरून फोन खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. वाचाः OPPO A15s चे फीचर्स ओप्पोच्या या फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. फोनची बॉडीची डिझाईन ३डी कर्व्ड आहे. फोनमध्ये अँड्रॉयड आधारीत कलर्स ७.२ दिला आहे. तसेच यात डार्क मोड सुद्धा मिळणार आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी३५ प्रोसेसर, ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. वाचाः OPPO A15s चा कॅमेरा या फोनमध्ये एआय ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा, दुसरा लेन्स २ मेगापिक्सलचा आणि तिसरा लेन्स २ मेगापिक्सलचा दिला आहे. कॅमेरासोबत नाइट मोड, टाइमलेप्स, स्लो मोशन यासारखे अनेक फीचर्स मिळणार आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः OPPO A15s ची बॅटरी फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 4230mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी वाय फाय, ब्लूटूथ, जीपीएस, हेडफोन जॅक आणि ड्यूल सिमचा सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mCSGbT

Comments

clue frame