वनप्लस ९ सीरीज सोबत OnePlus 9 Lite सुद्धा होणार लाँच

नवी दिल्लीः वनप्लस ९ सीरीजच्या युजर्संना खूप मोठी उत्सूकता आहे. पुढील वर्षी लाँच होणाऱ्या या सीरीजची काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. वनप्लसच्या या अपकमिंग सीरीजवरून लेटेस्ट माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, कंपनी (वनप्लस ९ आणि वनप्लस ९ प्रो) सोबत वनप्लस ९ लाईट सुद्धा लाँच करणार आहे. वाचाः स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर मिळणार अँड्रॉयड सेंट्रलच्या एका रिपोर्टनुसार, वनप्लस ९ आणि वनप्लस ९ प्रो मध्ये कंपनी लेटेस्ट ५ एनएम चिपसेटचा स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर देणार आहे. परंतु, वनप्लस ९ लाइटमध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर देणार आहे. वनप्लस ९ लाइट मध्ये या प्रोसेसरला देवून कंपनी फोनची किंमत कमी ठेवू शकते. सध्या वनप्लस ८ टी ची सुरुवातीची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. तसेच वनप्लस नॉर्डची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. वनप्लस ७ टी ची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः वनप्लस ७ टी होवू शकतो डिसकंटिन्यू एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, काही महिन्यात वनप्लस ७ टी ला कंपनी डिसकंटिन्यू करू शकते. वनप्लस ९ लाइट त्या युजर्ससाठी उपलब्ध राहिल जे वनप्लस नॉर्ड आणि वनप्लस ८ टीच्या मध्ये एखादा डिव्हाईस घेवू शकेल. वाचाः 120Hz रिफ्रेश रेट आणि फास्ट चार्जिंग वनप्लस ९ लाइटमध्ये वनप्लस ८ टी चे अनेक फीचर्स पाहायला मिळू शकतात. यात स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसर सोबत 90Hz किंवा 120Hz चे रिफ्रेश रेट मिळू शकतो. फोन वनप्लस ८ टी च्या कॅमेऱ्या वैशिष्ट्यासोबत येण्याची शक्यता आहे. वनप्लस ९ लाइटमध्ये ६५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो. वनप्लस ९ लाइटच्या फीचर्स संबंधी कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nMlgJ7

Comments

clue frame