खास महिलांसाठी Lava BeU स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत ६ हजार ८८८ रु

नवी दिल्लीः ला भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनीने लेटेस्ट बजेट स्मार्टफोन म्हणून लाँच केले आहे. हा नवीन फोन खास महिलासाठी डिझाइन करण्यात आला आहे. ज्यात क्रिस्टल स्टड डेकोरेशन आणि फ्लोरल स्पीकर मेश देण्यात आले आहे. लावाचा बीयू याशिवाय प्रीलोडेड सेफ्टी अॅप सोबत येतो. नवीन स्मार्टफोन शिवाय लावा कंपनी चार नवीन स्मार्टफओन ५ जानेवारी रोजी लाँच करणार आहे. ही माहिती कंपनीने दिली आहे. लावा बीयू स्मार्टफोन खरेदीसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पर्यायाचा वापर करता येवू शकतो. यासोबतच कंपनी फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स सोबत स्मार्ट बँड खरेदीची योजना बनवत आहे. वाचाः Lava BeU ची किंमत लावा बीयूची किंमत भारतात ६ हजार ८८८ रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा फोन खरेदी करता येवू शकतो. या फोनला रोज पिंक कलर ऑप्शन सोबत Lava International वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. याशिवाय याचे अतिरिक्त चार अन्य स्मार्टफोनला कंपनी व्हर्च्यूअल इवेंट मध्ये येत्या ५ जानेवारी रोजी लाँच करणार आहे. नवीन लावाच स्मार्टफोनची किंमत ५ हजारांपासूत ते १५ हजार रुपयांपर्यंत आहे. हे फोन सुद्धा ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही माध्यमांवर उपलब्ध होतील. तसेच कंपनी स्मार्ट फिटनेस ट्रेकिंग बँडला या पाच नवीन स्मार्टफोनसोबत आणण्याची तयारी करीत आहे. वाचाः Lava BeU चे खास वैशिष्ट्ये लावाच्या चार फोनच्या फीचर्सची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु, कंपनीने आपल्या अधिकृत Lava BeU ची माहिती कन्फर्म केली आहे. या फोनमध्ये ड्यूल सिम (नॅनो) फोन अँड्रॉयड गो एडिशन वर काम करणार आहे. या फोनमध्ये ६.०८ इंचाचा एचडी प्लस (720x1,560 पिक्सल) डिस्प्ले सोबत 19.5:9 आस्पेक्ट रेशियो मिळणार आहे. या फोनच्या डिस्प्ले मध्ये २.५डी कर्व्ड ग्लास आणि वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच देण्यात येणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38v7nsp

Comments

clue frame