जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, १ जानेवारीपासून प्रत्येक नेटवर्कवर फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने देशभरात प्रत्येक नेटवर्कवर फ्री कॉलची घोषणा केली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या निर्देशानुसार, १ जानेवारी पासून नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे सर्व राज्यांतर्गत व्हाइस कॉलवर इंटरनकनेक्ट युजेस चार्जेस () संपणार आहे. वाचाः जिओच्या म्हणण्यानुसार नॉन जिओ नेटवर्कवर राज्यांतर्गत व्हाइस कॉल चार्जला पुन्हा एकदा झीरो करण्यासाठी आणि आययूसी चार्ज संपण्यासोबत जिओ ग्राहकांना पुन्हा एकदा ऑफ नेट डोमेस्टिक फ्री व्हाइस कॉलचा फायदा मिळणार आहे. याची सुरुवात १ जानेवारी २०२१ पासून होणार आहे. जिओ नेटवर्कवर ऑन नेट डोमेस्टिक व्हाइस कॉल नेहमी फ्री राहिली आहे. वाचाः सप्टेंबर २०१९ मध्ये TRAI ने Bill & Keep सिस्टम लागू करण्यासाठी टाइमलाइनला एक्सटेंड करून १ जानेवारी जानेवारी २०२० केले होते. यानंतर जिओकडे ऑफ नेट व्हॉइस कॉलसाठी आययूसी चार्ज कायम ठेवण्यासोबतच पैसे वसूल करण्याचा ऑप्शन उरला होता. परंतु, आता जिओने विश्वास दिला आहे की, युजर्संना केवळ ट्रायकडून आययूसी चार्ज हटवण्यापर्यंत हे चार्ज द्यावा लागणार आहे. वाचाः ने ऑक्टोबर मध्ये एकूण २.२२ मिलियन नवीन मोबाइल ग्राहक जोडले आहेत. यासोबतच कंपनीकडे एकूण सब्सक्राईबर्सची संख्या ४०६.३ मिलियनपर्यंत पोहोचली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2X4GrdH

Comments

clue frame