नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया (Vi) ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी रेंज वाढवली आहे. युजर्संना आकर्षित करण्यासाठी कंपनी दिवसेंदिवस नवीन प्रीपेड प्लान्स लाँच करीत आहे. या यादीत आता कंपनीने दोन कॉम्बो प्लान्स लाँच केले आहेत. हे प्लान ५९ रुपये आणि ६५ रुपयांचे आहेत. जाणून घ्या या दोन्ही नवीन प्लानसंबंधी. वाचाः वोडाफोन आयडियाचा ५९ रुपयांचा प्लान वोडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये कॉलिंगसाठी ३० मिनिट मिळते. तसेच याचा वापर लोकल, नॅशनल आणि रोमिंग दरम्यान कॉलिंग करता येवू शकते. हा प्लान त्या युजर्संसाठी आहे. ज्यांना केवळ कॉलिंगची गरज पडते. प्लानमध्ये फ्री एसएमएस आणि डेटा बेनिफिट दिला जात नाही. वाचाः वोडाफोन-आयडियाचा ६५ रुपयांचा प्लान वोडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये तुम्हाला ५२ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये इंटरनेट चालवण्यासाटी १०० एमबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये फ्री एसएमएस आणि दुसरे बेनिफिट्स मिळत नाही. कंपनीचे हे दोन्ही प्लान सध्या महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये ऑफर केले जाते. वाचाः ७९ रुपयांत 400MB डेटा वोडाफोन - आयडियाचा ७९ रुपयांचा प्लान युजर्संना खूप पसंत पडत आहे. या प्लानमध्ये कंपनी ६४ रुपयांचा टॉकटाइम ऑफर करीत आहे. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये ४०० एमबी डेटाचा फायदा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37fv9Jv
Comments
Post a Comment