नवी दिल्लीः जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर अॅमेझॉनवर फॅब फोन फेस्ट सेल सुरू आहे. २५ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये जबरदस्त स्मार्टफोन्सवर बेस्ट डील दिली जात आहे. यासोबतच या सेलमध्ये एचडीएफसी बँकच्या कार्डवरून शॉपिंग केल्यास १५०० रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. सेल दरम्यान कंपनी प्राईम मेंबर्सला काही डिव्हाइसवर ५ हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट कूपन सुद्धा ऑफर करीत आहे. वाचाः वनप्लस 7T प्रो वर जबरदस्त ऑफर फॅब फोन्स फेस्टमध्ये वनप्लस 7T प्रो ला आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करता येवू शकते. फोनला ५ हजार रुपयांच्या डिस्काउंट कूपन सोबत याच्या हेज ब्लू कलर व्हेरियंटला ४३ हजार ९९९ रुपयांऐवजी ३८ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. हे डिस्काउंट कूपन सीमित मर्यादीत काळासाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच फोनला एक्सचेंज ऑफर केल्यास ११ हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो. वाचाः शाओमी Mi 10T 5G वर बंपर ऑफर या फोनला अॅमेझॉनवर ३५ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीसोबत लिस्ट करण्यात आले आहे. सेलमध्ये याफोनवर ३ हजारांची सूट मिळणार आहे. या सूटचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आयसीआयसीआय बँकच्या कार्डवरून ट्रान्झॅक्शन करावा लागेल. या फोनच्या प्राईम मेंबर्सला २ हजार रुपयांचा डिस्काउंट कूपन सुद्धा मिळणार आहे. तसेच फोनला एक्सचेंज ऑफर केल्यास १३ हजार रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट सोबत खरेदी करता येवू शकते. वाचाः आयफोन ११ वर बेस्ट डील ६४ हजार ९०० रुपये किंची सोबत लाँच करण्यात आलेल्या ६४ जीबीच्या व्हेरियंटला अॅमेझॉनवर आता ५१ हजार ९९९ रुपये किमतीत खरेदी करू शकता. जुन्या फोनला एक्सचेंज केल्यास ११ हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. वाचाः रेडमी ९ प्राइम वर बेस्ट एक्सचेंज ऑफर फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. अॅमेझॉनवर या फोनला एक्सचेंज ऑफर केल्यास तुम्हाला १० हजार ५० रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो. फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात १३ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. मीटियाटेक हीलियो जी ८० एसओसी वर काम करतो. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hdLNg4
Comments
Post a Comment