64MP कॅमेऱ्याचा Moto G9 Power स्मार्टफोन लाँच, १५ डिसेंबरपासून सेल

नवी दिल्लीः मोटोरोलाने भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केला आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. फोनचा सेल १५ डिसेंबर पासून फ्लिपकार्टवर सुरू करण्यात येणार आहे. मोटो जी ९ पॉवरमध्ये 6000 mAh बॅटरी आणि अनेक अन्य खास फीचर दिले आहेत. वाचाः मोटो जी ९ पॉवरचे खास वैशिष्ट्ये फोनमध्ये 720x1640 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.८ इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. फोन 20.5:9 च्या आस्पेक्ट रेशियो सोबत येतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 SoC चिपसेट दिला आहे. ड्यूल नॅनो सीम सपोर्ट करणारा हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः रियर फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय 802.11 ac, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-C आणि 3.5 mm हेडफोन जॅक यासारखे ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gGnUgU

Comments

clue frame