नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomi सीरीजची अनेकांना उत्सूकता आहे. शाओमीची ही लेटेस्ट फ्लॅगशीप सीरीज २८ डिसेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने एक पोस्ट शेयर करून या सीरीजच्या लाँचिंगची माहिती दिली आहे. शाओमी एमआय ११ सीरीज गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या पोस्टरने युजर्स आणि मी चाहत्यांची उत्सूकता आणखी वाढवली आहे. वाचाः स्नॅपड्रॅगन 888 5G प्रोसेसर मिळणार क्वॉलकॉमने आपला स्नॅपड्रॅगन 888 5G प्रोसेसर लाँच केला होता. या प्रोसेसर संबंधी म्हटले होते की, २०२१ च्या जवळपास सर्वच फ्लॅगशीप अँड्रॉयड डिव्हाइसमध्ये असणार आहे. प्रोसेसर लाँच करण्यात आल्यानंतर शाओमीने घोषणा केली आहे की, या प्रोसेसरवर काम करणारा सर्वात पहिला स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यामुळे अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, शाओमीच्या या फोनमध्ये हा स्नॅपड्रॅगन मिळणार आहे. वाचाः लाँचआधीच येवू शकतो अधिकृत रेंडर या सीरीजच्या स्मार्टफोन्सच्या फीचर्स आणि खास वैशिष्ट्यांसंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु, कंपनी लाँच आधी याच्या काही रेंडर्स लीक करू शकते. ज्यात या सीरीजचे खास फीचर्स आणि खास वैशिष्ट्यांची माहिती दिली जावू शकते. वाचाः सर्टिफिकेशन वेबसाइटवर झाले आहे स्पॉट काही दिवसांपूर्वी गीकबेंज आणि दुसऱ्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर Xiaomi M2011K2C डिवाइस अपकमिंग Mi 11 सीरीज चा ही स्मार्टफोन आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी दोन स्मार्टफोन Mi 11 आणि लाँच करू शकते. मॉडल नंबर M2011K2C फोनचे वनीला मॉडल असू शकतो. तसेच याचे कोडनेम विनस आहे. वाचाः १२जीबी रॅम आणि अँड्रॉयड ११ ओएस गीकबेंच लिस्टिंगनुसार हा फोन अँड्रॉयड ११ ओएस, १२ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सोबत येईल. तर ३सी वर या सीरीजला ५५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत पाहिले गेले आहे. या सीरीजमधील दोन्ही फोन क्वॉड एचडी प्लस रिझॉल्यूशन सोबत येतील. तसेच या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. वाचाः १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा फोनच्या रियर मध्ये फोटोग्राफीसाठी चौकोन कॅमेरा मॉड्यूल दिला जावू शकतो. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. ३सी लिस्टिंगनुसार Mi 11 मध्ये 4780mAh आणि Mi 11 प्रो मध्ये 4970mAh बॅटरी मिळू शकते. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hllIfn
Comments
Post a Comment