नवी दिल्लीः टेलिकॉम ऑपरेटर्सने काही वर्षाआधी मिनिमम रिचार्जचे प्रीपेड प्लान लाँच केले होते. ग्राहकांना आपले अकाउंट अॅक्टिव ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावा लागत होता. सध्या मिनिमम रिचार्ज फॅसिलिटी भारत एअरटेल आणि (Vi) च्या सर्व प्रीपेड युजर्संसाठी उपलब्ध आहे. या अनलिमिटेड कॉम्बो प्रीपेड प्लानची सुरुवात १०० रुपयांपासून होते. परंतु, प्रत्येक ग्राहक प्रत्येक महिन्याला १०० रुपयांपेक्षा जास्त खर्च उचलू शकत नाही. वोडाफोन - आयडियाकडे सध्या सर्विस वैधता रिचार्ज पॅक्स आहेत. (Vi) प्रीपेड युजर्सला ऑफर करण्यात येणाऱ्या रिचार्ज प्लानसंबंधी अधिक माहिती जाणून घ्या. वाचाः Vi चे सर्विस वैधता पॅक ३९ रुपयांपासून सुरू वोडाफोन आयडिया सर्विस वैधता प्रीपेड पॅकची किंमत ३९ रुपयांपासून सुरू होऊन ती ९५ रुपयांपर्यंत आहे. ३९ रुपयांच्या सर्विस वैधता पॅकमध्ये ३० रुपयांची लिमिटेड वैधता टॉक टाइम मिळत. या पॅकमध्ये १०० एमबी डेटा मिळतो. लोकल आणि नॅशनल व्हाइस कॉलसाठी २.५ पैसे प्रति सेकंदाप्रमाणे चार्ज केला जातो. या पॅकची वैधता १४ दिवसांची आहे. वाचाः ४९ रुपयांच्या सर्विस वैधता प्रीपेड पॅक एक असा प्लान आहे. जो आपल्या अकाउंटला अॅक्टिव ठेवण्यासाटी सर्व युजर्स पसंत करतात. या प्लानमध्ये ३८ रुपयांचा टॉकटाइम, १०० एमबी डेटा मिळतो. ग्राहकांना २.५ पैसे सेकंद प्रमाणे कॉल चार्ज आकारला जातो. प्रमोशनल ऑफर अंतर्गत युजर्संना कंपनीच्या मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवरून रिचार्ज करता येवू शकते. युजर्संना अतिरिक्त २०० एमबी डेटा मिळतो. म्हणजेच २८ दिवसांसाठी एकूण ३०० एमबी डेटा दिला जातो. वाचाः वोडाफोनच्या पुढील सर्विस वैधता प्रीपेड पॅकची किंमत ७९ रुपये आहे. या पॅकमध्ये ६४ टॉकटाइम आमि ३०० एमबी डेटा ऑफर केला जातो. व्हाइस कॉलसाठी एक पैसे प्रति सेकंद चार्ज आकारला जातो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. जर ग्राहकांनी वोडाफोन-आयडियाच्या मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारे रिचार्ज करत असतील तर त्यांना लिमिटेड पीरियडसाठी ४०० एमबी डेटा मिळतो. वाचाः तर ९५ रुपयांच्या सर्विस वैधता प्रीपेड पॅकमध्ये ७४ रुपयांचा टॉक टाइम आणि २०० एमबी डेटा मिळतो. लोकल आणि एसटीडी कॉलसाठी २.५ पैसे प्रति सेकंद चार्ज आकारला जातो. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lz9G32
Comments
Post a Comment