Vivo V20 Pro 5G भारतात २ डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी विवोने आपला स्मार्टफोन Vivo V20 नुकताच लाँच केला होता. आता कंपनी आपला पुढचा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. विवोच्या या स्मार्टफोनला 5G चे सपोर्ट दिला जाणार आहे. वाचाः Vivo V20 Pro साठी कंपनीने टीजर जारी केला आहे. कंपनीने हा दावा सुद्धा केला आहे की, हा फोन सर्वात स्लीम ५जी स्मार्टफोन असणार आहे. कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरून याचा टीजर पोस्ट शेयर केले आहे. Vivo V20 Pro या फोनला सप्टेंबर महिन्यात थायलंडमध्ये लाँच केले होते. भारतात आता त्याच फोनच्या वैशिष्ट्यांसह हा फोन लाँच केला जाणार आहे. वाचाः Vivo V20 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 765G प्रोसेसर दिला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला आहे. सेल्फी कॅमेऱ्या एक ४४ मेगापिक्सलचा आहे तर दुसरा ८ मेगापिक्सलचा आहे. रियर कॅमेऱ्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्याचा लेन्स दिला आहे. दुसरा ८ मेगापिक्सलचा तर तिसरा २ मेगापिक्सलचा लेन्स आहे. वाचाः Vivo V20 Pro मध्ये पॉवर देण्यासाठी 4,000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनला ३३ वॉट फास्ट चार्जिंग बॅटरीचा सपोर्ट दिला आहे यात अंडर डिस्प्ले फ़िंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी USB Type C पोर्ट दिले आहे. सध्या हे स्पष्ट नाही की, कंपनी भारतात याच वैशिष्ट्यांसोबत फोनला लाँच करणार की, भारतातील लाँचिंगवेळी हार्डवेयर मध्ये बदल करून त्याला लाँच करेल, हे अद्याप कंपनीने स्पष्ट केलेले नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ji5RkI

Comments

clue frame