नवी दिल्लीः भारतात सध्या विदेशी प्रोडक्ट्स पेक्षा मेड इन इंडिया प्रोडक्ट्सला प्राधान्य दिले जात आहे. परंतु, विदेशी कंपन्यांना सुद्धा भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच नायजेरिया आणि फिलिपिन्स पर्यंत मर्यादीत असलेली कंपनी आपला नवीन स्मार्टफोन येत्या ४ डिसेंबर रोजी भारतात लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची लाँचिंग ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून झाली आहे. वाचाः फ्लिपकार्टवर बनवलेल्या टीजरनुसार, ४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता फोन लाँच करणार आहे. भारतात टेक्नोचा हा बजेट स्मार्टफोन असणार आहे. टेक्नो पोवाची किंमत १० हजार ८०० रुपये आहे. याच किंमतीत या फोनला भारतात लाँच केले जावू शकते. वाचाः टेक्नो पोवा मध्ये पंच होल डिस्प्ले, रियर वर फ्रिंगरप्रिंट सेंसर आणि क्वॉड रियर कॅमेरा सेटअप यासाऱखे खास वैशिष्ट्ये दिले आहेत. फोनला मॅजिक ब्लू, स्पीड पर्पल आणि डेजल ब्लॅक कलर मध्ये आणले जाणार आहे. फोनमध्ये ६.८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. यात पंच होल कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर दिला आहे. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. वाचाः टिप्स्टर मुकुल शर्माच्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये रियरवर १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचे दोन सेन्सर आणि एक AI HD लेंस दिले आहे. फोनमध्ये ड्यूल फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी मोठी 6000mAh बॅटरी दिली आहे. जी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36jqRkd
Comments
Post a Comment