नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे वेगवेगळ्या किंमतीचे व वेगवेगळ्या बेनिफिट्स असलेले वेगवेगळे गटातील प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. परंतु, अनेकांना माहिती नाही की, जिओच्या कोणत्या रिचार्ज पॅकमध्ये सर्वात जास्त डेटा ऑफर केला जात आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओच्या २५९९ रुपयांच्या रिचार्ज पॅकसंबंधी माहिती देत आहोत. जिओचा हा पॅक सर्वात जास्त डेटा ऑफर केला जाणारा प्रीपेड प्लान आहे. वाचाः २५९९ रुपयांच्या प्लानसंबंधी सर्वकाही माहिती जिओच्या २५९९ रुपयांचा प्रीपेड प्लानची वैधता ३६५ दिवसांची म्हणजेच एका वर्षाची आहे. ग्राहकांना या रिचार्ज प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. याशिवाय, १० जीबी अतिरिक्त डेटा या प्रीपेड पॅकमध्ये मिळतो. म्हणजेच ग्राहकांना ७४० जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा मिळू शकतो. रोज मिळणाऱ्या हाय स्पीड डेटा ची लिमिट संपल्यानंतर ही स्पीड कमी होवून 64Kbps होते. वाचाः या प्लानमध्ये कॉलिंग बेनिफिट्स मध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड तर नॉन जिओ नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १२ हजार मिनिट्स ऑफर केले जातात. तसेच ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री पाठवण्याची सुविधा दिली जाते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन या प्रीपेड प्लानमध्ये फ्री मिळते. जिओचा २५९९ रुपयांच्या या रिचार्ज पॅकमध्ये १ वर्षासाठी ३९९ रुपये किंमतीचा डिज्नी प्लस हॉटस्टार मेंबरशीप फ्री दिली जाते. वाचाः याशिवाय, जिओकडे २३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. जो ३६५ दिवसांची म्हणजेच एका वर्षाची वैधतेसोबत येतो. या पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा सोबत ७३० जीबी डेटा मिळतो. तर २१२१ रुपयांच्या रिचार्ज पॅकची वैधती ३३ दिवसांची आहे. यात ५०४ जीबी डेटा ऑफर केला जातो. जिओचा ४९९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता ३६० दिवसांची आहे. यात ३५० जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kzdeBg
Comments
Post a Comment