नवी दिल्लीः भारतात पुन्हा एकदा नवीन JioPhone आणू शकते. रिपोर्टच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओ चीनी स्मार्टफ़ोन मेकर सोबत पार्टनरशिप करण्याची तयारी करीत आहे. रिलायन्स जिओने स्वस्त जिओ फोन आणून टेलिकॉम कंपन्यांना जोरदार आव्हान दिले होते. जिओच्या आगमनानंतर टेलिकॉम सेक्टरमधील प्रतिस्पर्धी कंपन्यांचे धाबे दणाणले होते. जिओने अवघ्या थोड्याच कालावधीत नंबर वन स्थान पटकावले आहे. वाचाः च्या एका रिपोर्ट मध्ये हा दावा करण्यात आला आहे की Reliance Jio चीनी कंपनी Vivo सोबत यासंबंधी चर्चा करीत आहे. या नवीन JioPhone अंतर्गत कंपनी OTT सब्सक्रिप्शन वर डिस्काउंट ऑफर्स देवू शकते. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रिलायन्स जिओ आपल्या पुढील जिओ फोन सोबत वन टाइम स्क्रीन, रिप्लेसमेंट, सब्सक्रिप्शन आणि शॉपिंगच्या अनेक ऑफर्स सुद्धा देणार आहे. यासाठी ग्राहकांना रिलायन्स जिओचे सिम कार्ड वापरावे लागेल. वाचाः कंपनी केवळ विवो सोबत चर्चा करीत नाही तर दुसऱ्या अन्य भारतीय स्मार्टफोन मेकर जसे, लावा आणि कार्बन सोबत सुद्धा चर्चा करीत आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले की, या स्मार्टफोनची जास्तीत जास्त किंमत ८ हजारांपर्यंत असू शकते. रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, रिलायन्स जिओ ने चिनी हँडसेट मेकर iTel सोबत 4G हँडसेट बनवण्यासाठी पार्टनरशीप करीत आहे. हे स्मार्टफोनमस ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या आत असतील. विशेष म्हणजे, रिलायन्स जिओ ला स्वस्त ४जी हँडसेट आणल्यास सुद्धा अन्य कंपन्यांची जोरदार टक्कर मिळू शकते. कारण, आता अन्य कंपन्या स्मार्टफोन स्वस्त किंमतीत लाँच करीत आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fGpwqD
Comments
Post a Comment