जिओच्या या ३ प्लानमध्ये रोज मिळतो ३ जीबी डेटा, ८४ दिवसांची वैधता

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे प्रीपेड कनेक्शन आहे. यात जास्त डेटाची गरज असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जिओकडे असे तीन प्लान आहेत. ज्यात रोज ३ जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३ हजार मिनिटे मिळतात. जर तुम्हाला जिओच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा हवा असेल तसेच ८४ दिवसांची वैधता असलेले प्लान हवे असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला या तीन प्लानसंबंधी खास माहिती देत आहोत. वाचाः ३४९ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात रोज ३ जीबी डेटा म्हणजेच ८४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसचे अन्य दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार मिनिट मिळतात. या प्लानमध्ये रोज १०० मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते. वाचाः ४०१ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये युजर्संना डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. पंरतु, यात रोज ३ जीबी डेटा शिवाय ६ जीबी एक्स्ट्रा म्हणजेच एकूण ९० जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये रोज १०० मेसेज आणि दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार मिनिट्स मिळतात. तसेच वर्षभरासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः ९९९ रुपयांचा प्लान जिओचा हा ३ जीबी डेटा मिळणार हा तिसरा प्लान आहे. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा म्हणजेच एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये अन्य दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग साठी ३ हजार मिनिट्स आणि रोज १०० मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fbFKb6

Comments

clue frame