नवी दिल्लीः नुकतेच सर्वात मोठे टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर बनले आहे. जिओ पहिली टेलिकॉम कंपनी आहे. जिच्याकडे ४०० मिलियन हून जास्त सब्सक्रायबर्स आहेत. जिओने भारतीय टेलिकॉम बाजारात एन्ट्री करताना खूप प्रसिद्धी मिळवली होती. जाणून घ्या जिओच्या १.५ जीबी डेली डेटाच्या प्लान्स संबंधी. या प्लानमध्ये २८ दिवसांच्या वैधतेपासून वर्षभराची वैधता मिळते. वाचाः जिओचा १९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. रोज १.५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण ४२ जीबी डेटा ऑफर केला जातो. याशिवाय, प्लानमध्ये नॉन जिओ नंबर वर कॉलिंग साठी १ हजार मिनिट सोबत १०० एसएमएस रोज मिळते. वाचाः जिओचा ३९९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा रोज मिळतो. ५६ दिवसांच्या वैधतेसोबत मिळणाऱ्या या प्लानमध्ये एकूण ८४ जीबी डेटा ऑफर केला जातो. तसेच जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळते. वाचाः जिओचा ५५५ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा रोज मिळतो. परंतु, या प्लानमध्ये जास्त वैधता मिळते. ८४ दिवसांची वैधता मिळत असून एकूण १२६ जीबी डेटा युजर्संना मिळतो. वाचाः ७७७ रुपयांचा जिओ प्लान जिओच्या या प्लानमध्ये ५५५ रुपयांच्या प्लानप्रमाणे बेनिफिट्स आणि वैधता मिळते. परंतु, या प्लानमध्ये कंपनी ५ जीबी अतिरिक्त डेटा ऑफर करते. ज्यात ८४ दिवसांच्या वैधतेत एकूण १३१ जीबी डेटा मिळतो. तसेच डिज्नी प्लस हॉटस्टारची एक वर्षापर्यंत व्हीआयपी मेंबरशीप मिळते. वाचाः २१२१ रुपयांचा जिओ प्लान जिओच्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन फ्री मिळते. याशिवाय १२ हजार नॉन जिओ मिनिट मिळते. रोज १०० एसएमएस मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kZdZnr
Comments
Post a Comment