प्रतिक्षा संपली! या तारखेला भारतात रिलाँच होऊ शकतो पबजी मोबाइल

नवी दिल्लीः पबजी नाम ही काफी है.... सर्वात प्रसिद्ध बॅटल गेम्सपैकी एक आहे. भारत सरकारने काही महिन्यांपूर्वी पबजी मोबाइलवर बंदी घातली आहे. परंतु, आता पबजी कॉर्पोरेशनने भारतात पबजी रिलाँचची घोषणा केली आहे. भारतात पबजी मोबाइल पुन्हा एकदा येत असल्याने पबजी चाहत्यांत खूप उत्सूकता वाढली आहे. वाचाः कधी लाँच होणार पबजी मोबाइल कंपनीने या गेमला रिलाँच कन्फर्म केले आहे. परंतु, यासंबंधी कंपनीने तारखेची घोषणा अद्याप केलेली नाही. कंपनीची अधिकृत वेबसाइटवर आता ‘Coming Soon’ लिहिले आहे. इंडिया टीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, कंपनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या गेमला रिलाँच करू शकते. रिपोर्टमध्ये म्हटले की, १ डिसेंबर ते ५ डिसेंबर या दरम्यान गेमला लाँच केले जावू शकते. वाचाः भारत सरकारने घातली होती बंदी काही महिन्याआधी भारत सरकारने पबजी मोबाइल सह अनेक चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. यानंतर दक्षिण कोरियाची कंपनीने चीनमधून भारतातील या गेमचे डिस्ट्रिब्यूशन राइट्स परत घेतले होते. वाचाः अनेकदा बंदी घातले गेले चायनीज अॅप्स भारतात सर्वात आधी जूनमध्ये टिकटॉक, हेलो सह ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलै मध्ये ४७ आणखी अॅप्सवर भारतात बंदी घातली होती. तसेच २ सप्टेंबर रोजी पबजी सह ११८ मोबाइल अॅप्सवर बंदी घातली होती. तर आता या महिन्यात स्नॅक व्हिडिओ सह ४३ चायनीज अॅप्सवर सरकारकूडन बंदी घालण्यात आली होती. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33oxO1m

Comments

clue frame