सेलः LG फोनवर ४५ हजार आणि सॅमसंग स्मार्टफोनवर २५ हजारांची सूट

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर आज दुपारी १२ वाजेपासून ला सुरुवात होत आहे. आजपासून सुरू होणारा हा सेल ४ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला प्रसिद्ध स्मार्टफोनवर ४५ हजार रुपयांपर्यंत सूट आणि जबरदस्त डील मिळणार आहे. या सेलमध्ये अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून शॉपिंग केल्यास युजर्संना १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. वाचाः LG G8x या सेलमध्ये या फोनवर ७० हजार रुपयांऐवजी केवळ २४ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकते. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज्या या फोनमध्ये ड्यूल स्क्रीन दिला आहे. या फोनला एक्सचेंज ऑफर अंतर्गत १४.३५० रुपयांचा फायदा मिळू शकतो. या फोनला नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा खरेदी करता येवू शकते. नो कॉस्ट ईएमआयची सुरुवात २०८३ रुपयांपासून होते. हा फोन ३ नोव्हेंबर रोजी सेलमध्ये उपलब्ध होईल. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी नोट १० प्लस सॅमसंगचा हा फोन सेलमध्ये २५ हजारांच्या सूटसोबत उपलब्ध होणार आहे. कंपनीने या फोनला लिमिटेड ऑफरमध्ये ठेवले आहे. फोनला एक्सचेंज केल्यास १४ हजार ३५० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनला ९ हजार ४४५ रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. वाचाः रियलमी नार्जो २० प्रो रियलमीच्या या फोनला ३ हजार रुपयांच्या सूटसोबत खरेदी करता येवू शकते. सूटनंतर हा फोन १३ हजार ९९९ रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. हा फोन २५०० रुपयांच्या प्रति महिना नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येवू शकतो. फोनला एक्सचेंज ऑफर अंतर्गत १४ हजार ३५० रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो. वाचाः इनफिनिक्स हॉट ९ फ्लिपकार्टवर दिवाळी सेलमध्ये या फोनला सूट नंतर ९ हजार ४९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनवर ८ हजार ९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो. फोन नो कॉस्ट ईएमआय ७९२ रुपयांच्या प्रति महिना पासून सुरूवात होते. वाचाः विवो V20 ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रॅमच्या फोनची किंमत कमी होऊन ती २४ हजार ९९० रुपये झाली आहे. एक्सचेंज ऑफर मध्ये या फोनला खरेदी केल्यास १४ हजार ३५० रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि ४४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31ULMHv

Comments

clue frame