नवी दिल्लीः भारतात अॅपलच्या आणि साठी प्री-ऑर्डरची सुरुवात झाली आहे. ग्राहक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट किंवा अॅपल स्टोरवरून प्री ऑर्डर करू शकतात. ग्राहकांना ईएमआयची सुविधा दिली जावू शकते. परंतु, जर तुम्हाला स्वस्तात आयफोन खरेदी करायचा असेल तर त्याची एक पद्धत आहे. जाणून घ्या ही पद्धत. वाचाः आयफोन १२ सीरीजची किंमत अॅपल आयफोन १२ ची किंमत ७९ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते. यात ६४ जीबी मॉडलची किंमत आहे. तसेच १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८४ हजार ९०० रुपये आहे. तर २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९४ हजार ९०० रुपये आहे. त्याचप्रमाणे आयफोन १२ प्रोच्या १२८ जीबी व्हेरियंटची किंमत १ लाख १९ हजार ९०० रुपये, २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १ लाख २९ हजार ९०० रुपये आणि ५१२ जीबी व्हेरियंटची किंमत १ लाख ४९ हजार ९०० रुपये आहे. वाचाः या ठिकाणी मिळणार ६ हजारांपर्यंत कॅशबॅक जर तुम्हाला १२ सीरीजचा फोन स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुम्ही ची डील तुमच्यासाठी खास आहे. इंडिया स्टोर डॉट कॉम ही भारतातील अॅपलची अधिकृत डिस्ट्रिब्यूटर आहे. या ठिकाणी आयफोन १२ वर ६ हजार रुपये आणि आयफोन १२ प्रोवर ५ हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. तसेच जुन्या फोनच्या बदल्यात ६ हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे. तसेच ही ऑफर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर लागू होणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37Fnghr
Comments
Post a Comment