Infinix Hot 10 चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत ८,९९९ रु.

नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर कंपनी इनफिनिक्स ने या महिन्याच्या सुरुवातीला आपला लाँच केला होता. कंपनीने त्यावेळी केवळ एकच व्हेरियंट आणले होते. ज्यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळत होते. आता कंपनीने या फोनचा आणखी एक नवीन व्हेरियंट भारतात लाँच केले आहे. नवीन व्हेरियंट मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. आता हा फोन दोन व्हेरियंटमध्ये आला आहे. वाचाः फोनची किंमत कंपनीने इनफिनिक्स हॉट १० स्मार्टफोनच्या ४ जीबी व्हेरियंटची किंमत ८ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. याची विक्री २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपासून केली जाणार आहे. तर याच्या ६ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ९९९९ रुपये ठेवण्यात आली होती. फोन चार कलर ऑप्शन - ऑब्सिडिअन ब्लॅक, मूनलाइट झेड, अंबर झेड आणि ओशन वेव मध्ये येते. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.७९ इंचाचा HD+ IPS डिस्प्ले दिला आहे. ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंचहोल मिळतो. फोनच्या फ्रंट आणि बॅन पॅनेलच्या प्रोटेक्शनसाठी २.५ डी कर्व्ड ग्लास दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम पर्यंत, १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी70 प्रोसेसर दिले आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो.ज्यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक लो लाइट सेन्सर दिला आहे. ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,200mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर २३ तास व्हिडिओ प्ले बॅक, ६६ दिवसाचा स्टँडबाय टाइम देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3krphkO

Comments

clue frame