नवी दिल्लीः Google ने आपल्या ला बंद केले आहे. गुगलचे हे अॅप प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले आहे. कंपनीने सांगितले की, १ डिसेंबर २०२० पासून याचा सपोर्ट बंद केला जाणार आहे. गुगल गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रोडक्ट्स आणि सर्विसेजला चांगले करण्यसाठी असे पाऊल उचलत आहे. गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅपला गुगल लॅटिट्यूड आणि गुगल प्लस लोकेशन शेयरिंग करणे बंद केले होते. वाचाः २०१६ मध्ये लाँच झाले होते गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅपला २०१६ मध्ये लाँच केले होते. याद्वारे युजर आपल्या फेवरिट कॉन्टॅक्टसोबत डिव्हाईस अॅक्टिविटी स्टेट्स आणि लोकेशन शेयर करू शकत होते. सुरूवातीला कंपनी या सर्विससाठी केवळ अँड्रॉयड युजर्सला ऑफर करीत होती. नंतर आयओएससाठी अॅपल स्टोरवर उपलब्ध केले होते. वाचाः ईमेल करून दिली माहिती ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्सचा वापर करणाऱ्या युजर्संना गुगलने बंद होत असल्याची माहिती ईमेल करून दिली आहे. यात सांगितले की, लोकेशन शेयरिंगला आता गुगल मॅप्ससोबत जोडले आहे. त्यामुळे आता ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्सची गरज नाही. कंपनीने हेही सांगितले की, प्ले स्टोरवरून याला आता डाऊनलोड करता येणार नाही. गुगलने स्पष्ट सांगितले की, याला १ डिसेंबर २०२० पर्यंत युजर वापरू शकतात. त्यानंतर ते आपोआप बंद होईल. वाचाः हँगआउट बंद करण्याची तयारी गुगल आता हळूहळू हँगआउट युजर्सला चॅटवरून शिफ्ट करणे सुरू केले आहे. गुगल चॅट गुगल वर्कप्लेसचा एक भाग आहे. गुगलने वर्कस्पेस ला जी सूट ला रिब्रँडेड व्हर्जन म्हणून लाँच केले आहे. नोव्हेंबर २०२० पासून सर्व युजर्सला गुगलकडून व्हिडिओ हँगआउटच्या जागी मिट युज करण्यासाठी प्रोम्प्ट केले जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FEMnFh
Comments
Post a Comment