३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत रोज ४जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगचे बेस्ट प्लान

नवी दिल्लीः सध्या मार्केटमध्ये असे काही प्लान आहेत. ज्यात जास्त डेटा सोबत फ्री कॉलिंग आणि अन्य दुसरे बेनिफिट्स दिले जातात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या काही प्लानसंबंधी माहिती देत आहोत. या प्लान्समध्ये रोज ४ जीबी डेटा, फ्री कॉलिंग शिवाय, अनेक अतिरिक्त सर्विस फ्री मिळतात. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्लानची किंमत ३०० रुपयांपेक्षा कमी आहे. वाचाः वोडाफोन-आयडियाचा २९९ रुपयांचा प्लान वोडाफोन - आयडियाचा हा प्लान विकेंड डेटा रोलआउट आणि डबल डेटा बेनिफिटसोबत येतो. याची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज ४ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानच्या सब्सक्रायबर्सला डेली १०० डेली फ्री एसएमएस मिळते. वाचाः रिलायन्स जिओचा २४९ रुपयांचा प्लान २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानममध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. प्लानच्या सब्सक्रायबर्स देशभरात जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग करू शकतो. तर दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १ हजार मिनिट्स मिळते. १०० फ्री एसएमएस सोबत जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस मिळते. वाचाः एअरटेलचा २९८ रुपयांचा प्लान ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीती एअरटेलचा हा प्लान खूप प्रसिद्ध आहे. यात रोज २ जीबी डेटा मिळतो. २८ दिवसांच्या वैधतेसोबत या प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्लानमध्ये रोज १०० एसएमएस मिळते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. तसेच या प्लानच्या सब्सक्रायबर्सला फास्टॅगच्या खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mmIapE

Comments

clue frame