नवी दिल्लीः फेस्टिवल सीजनमध्ये तुम्हाला जर इंडियन ब्रँडचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर शिंको कंपनीने तुमच्यासाठी खास अॅमेझॉनवर बेस्ट डील आणली आहे. अॅमेझॉन फेस्टिवल सेलमध्ये शिंकोचा ३२ इंचाचा टीव्ही केवळ ८ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. अॅमेझॉन सेलमध्ये शिंकोच्या ३२ इंच टीव्हीवर ५० टक्के सूट मिळत आहे. तसेच यासोबत फ्री इंन्स्टॉलेशन सह अन्य सुविधेचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही एचडीएफसीच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून खरेदी केली तर तुम्हाला १० टक्के अतिरिक्त सूट मिळू शकते. तसेच कॅशबॅक ऑफरही आहे. वाचाः शिंकोच्या ३२ इंचाच्या दोन स्मार्ट टीव्हीचे नाव SO3A (32) HD Ready LED TV आणि SO328AS (32) HD ready smart LED TV असे आहेत. UNIWALL सोबत 32 इंचाचे SO328AS मॉडलची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. आधी याची किंमत १६ हजार ९९० रुपये होती. SO3A ची किंमत सेलआधी १२ हजार ९९० रुपये होती. परंतु, आता ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. वाचाः पाहा फीचर्स शिंकोच्या या टीव्हीच्या फीचर्स मध्ये SO3A मॉडल HRDP डिस्प्ले सोबत येतो. ज्यात जबरदस्त पिक्चर क्वॉलिटी आहे. हा टीव्ही 2 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट सोबत येते. शिंकोच्या या टीव्हीत २० वॉटचे स्पीकर लावले आहे. शिंकोच्या SO328AS स्मार्ट टीवी मॉडलमध्ये HRDP डिस्प्ले टेक्नोलॉजी दिली आहे. यात जबरदस्त पिक्चर क्वॉलिटी आहे. या स्मार्ट टीव्हीत एक जीबी रॅम प्लस ८ जीबी स्टोरेज सोबत येते. अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या या टीव्हीत 3 HDMI आणि 2 USB पोर्ट सोबत २० वॉटचे स्पीकर लावले आहेत. या स्मार्ट टीव्हीत नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ सह अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा आनंद घेता येवू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ooM96K
Comments
Post a Comment