वायरविना १९ मिनिटात चार्ज होणार स्मार्टफोन, लाँच झाली जबरदस्त टेक्नोलॉजी

नवी दिल्लीः Xiaomi ने आपली लेटेस्ट आणि अडवॉन्स वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला लाँच केले आहे. ८० वॉटची रेटिंग असल्याने जगातील सर्वात फास्ट वायरलेस टेक्नोलॉजी याला म्हटले जात आहे. कंपनीचा दावा आहे की, या टेक्नोलॉजीच्या मदतीने 4000mAh ची बॅटरीचा स्मार्टफोन केवळ १९ मिनिटात चार्ज करता येवू शकतो. याच कॅपसिटीची बॅटरीला ही टेक्नोलॉजी ८ मिनिटात ५० टक्क्यापर्यंत चार्ज करते. वाचाः आधी आली होती. ५० वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी याआधी शाओमीने सर्वात वेगवान वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजीला लाँच केले होते. ती ५० वॉटची होती. या टेक्नोलॉजीला कंपनीने या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच केलेल्या Mi 10 Ultra स्मार्टफोन मध्ये ऑफर केले होते. तर मार्च २०२० मध्ये कंपनीने आपली ४० वॉटची फास्ट वायरलेस चार्जिंगवरून पडदा हटवला होता. वाचाः Mi MIX 2S वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजीत शाओमी खूप पुढे आहे. कंपनीने सर्वात आधी Mi MIX 2S स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजीला इंट्रोड्यूस केले होते. हा फोन ७.५ वॉटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येत होता. यानंतर कंपनीने Mi MIX3 ला आणले. यात १० वॉटची चार्जिंग सोबत येत होता. गेल्यावर्षी कंपनीने Mi 9 स्मार्टफोन लॉन्च केला होता. फोनमध्ये २० वॉट फास्ट चार्जिंग मिळत होती. वाचाः पुढील वर्षी १०० वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीचा फोन शाओमी सध्या १०० वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीवर काम करीत आहे. या टेक्नोलॉजीला पुढील वर्षी लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Hc5ffF

Comments

clue frame