नवी दिल्लीः टेलिकॉम ऑपरेटर () कडून गेल्या काही महिन्यांपासून युजर्संना डबल डेटाचा फायदा दिला जात आहे. या स्कीम अंतर्गत युजर्संना कोणत्य़ाही रिचार्ज प्लानमध्ये मिळणाऱ्या डेटावरून डबल डेटा मिळतो. जर तुम्ही कोणत्याही प्रीपेड प्लानवरून रिचार्ज केल्यास २ जीबी डेटा ऑफर मिळत असल्यास २ जीबी डेटा ऐवजी रोज ४ जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. या बेनिफिट्स सोबत युजर्संना ३३६ जीबी पर्यंत डेटा मिळू शकतो. वाचाः ६९९ रुपयांचा प्लान डबल डेटा अंतर्गत ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सला २ जीबी ऐवजी रोज ४ जीबी डेटा मिळतो. Vi चा हा प्लान ८४ दिवसांच्या वैधते सोबत युजर्संना पूर्ण वैधता परियड मध्ये एकूण ३३६ जीबी डेटा या प्लानमध्ये मिळतो. तसेच देशभरात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस मिळतो. युजर्संना 'Vi Movies & TV'चे अॅक्सेस सोबत MPL कॅश आणि Zomato डिस्काउंट बेनिफिट मिळतो. वाचाः ४४९ रुपयांचा प्लान ४४९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसाची आहे. यात २ जीबी ऐवजी ४ जीबी डेली डेटा मिळतो. या प्लान मध्ये युजर्संना २२४ जीबी डेटा ऑफर मिळतो. तसेच सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस सुद्धा मिळतो. प्लानमध्ये 'Vi Moview & TV', MPL कॅश आणि Zomato डिस्काउंट मिळतो. वाचाः २९९ रुपयांचा प्लान डबल डेटा ऑफर करणारा हा स्वस्त प्लान आहे. याची वैधता २८ दिवसांची आहे. यात रोज २ जीबी डेटा मिळतो. परंतु, स्कीम अंतर्गत यात रोज ४ जीबी डेटा युजर्संना मिळतो. यात एकूण ११४ जीबी डेटा प्लान ऑफर केला जातो. अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट शिवाय या प्लानमध्ये 'Vi Moview & TV', MPL कॅश आणि Zomato डिस्काउंट चा फायदा मिळतो. तसेच युजर्संना रोज १०० फ्री एसएमएस मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37qJJP1
Comments
Post a Comment