नवी दिल्लीः () चा स्मार्टफोन आतापर्यंत खरेदी केला नसेल तर आज खरेदीची चांगली संधी आहे. या स्मार्टफोनचा सेल आज दुपारी १२ वाजता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट वर सुरू होणार आहे. जुलै मध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच, 5,000mAh बॅटरी आणि ड्यूल रियर कॅमेरा सेटअप यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. वाचाः Realme C11 ची किंमत Realme C11 स्मार्टफोन एकाच व्हेरियंट मध्ये म्हणजेच 2GB + 32GB येतो. याची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध आहे. स्मार्टफोनची थेट टक्कर रेडमी ९ आणि सॅमसंग गॅलेक्सी ए०१ स्मार्टफोन सोबत आहे. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारित रियलमी यूआय वर काम करतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि रेजॉलूशन 720x1600 पिक्सल आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. तसेच फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर दिला आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे 5,000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट चार्जिंग सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. तर सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32zTY0M
Comments
Post a Comment