लाँचआधीच लीक झाली OnePlus 8T स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः स्मार्टफोनची जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. कंपनीने सोमवारी कन्फर्म केले आहे की, येत्या १४ ऑक्टोबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. फोनला कंपनीने अॅमेझॉनवरून विक्री करणार आहे. या दरम्यान लाँच आधी एक टिप्स्टरने OnePlus 8T ची किंमत लीक केली आहे. टिप्स्टरने फोनच्या युरोपियन मार्केटची किंमतीसंबंधी माहिती दिली आहे. वाचाः इतकी असू शकते किंमत लीक झालेल्या रिपोर्टनुसार, युरोपमध्ये OnePlus 8T च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७९९ यूरो म्हणजेच ६९ हजार रुपये असू शकते. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत ८९९ यूरो म्हणजेच ७७ हजार ६०० रुपये असू शकते. टिप्स्टरच्या एका सोर्सच्या हवाल्याने सांगितले की, अमेरिकेत या फोनच्या ८ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ७९९ डॉलर जवळपास ७३ हजार ३०० रुपये आणि १२ जीबी रॅमच्या व्हेरियंटची किंमत ८९९ डॉलर ६६००० रुपये असू शकते. म्हणजेच वनप्लस ८ १०० युरो डॉलर महाग होऊ शकतो. वाचाः OnePlus 8T मध्ये मिळू शकतात हे फीचर समोर आलेल्या रिपोर्टनुसार, OnePlus 8T मध्ये पंचहोल डिझाईन सोबत ६.५ इंचाचा एस अमोलेड डिस्प्ले दिला जावू शकतो. फुल एचडी रिझॉल्यूशन सोबत येणाऱ्या या फोनमध्ये डिस्प्ले मध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट मिळू शकतो. फोनमध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर ऑफर करू शकते. वाचाः फोनमध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड Oxygen OS 11 ऑफर केले जावू शकते. फोनची बॅटरी संबंधी माहिती देताना यात 4500mAh असणार आहे. ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येईल. फोटोग्राफीत या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. ज्यात ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, ५ मेगापिक्सलचा माय्रको शूटर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ शूटर कॅमेरा मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cmD09h

Comments

clue frame