शाओमीने लाँच केली Mi 10T स्मार्टफोन सीरीज, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीने लाँच केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने Mi 10T, आणि स्मार्टफोन लाँच केला आहे. Mi 10T, Mi 10T Pro कंपनीचे फ्लॅगशीप स्मार्टफोन आहेत. ज्यात शाओमीचे Mi 10 आणि Mi 10 Pro स्मार्टफोनची जागा घेतली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये पंचहोल डिझाईन आहे. दोन्ही फोनमध्ये फरक आहे. मी १० टी मध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तर मी १० टी प्रोमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तिन्ही फोन ५ जी सपोर्ट करतात. वाचाः फोनची किंमत Mi 10T दोन व्हेरियंटमध्ये येते. याच्या 6GB + 128GB व्हेरियंटची किंमत 499 यूरो (जवळपास 43,000 रुपये) आणि 8GB + 128GB व्हेरियंट ची किंमत 549 यूरो (जवळपास 47,200 रुपये) आहे. याच प्रमाणे Mi 10T Pro च्या 8GB + 128GB व्हेरियंटची किंमत 599 यूरो (जवळपास 51,700 रुपये), 8GB + 256GB व्हेरियंटची किंमत 649 यूरो (जवळपास 56,000 रुपये) आहे. तर, Mi 10T च्या 6GB + 64GB व्हेरियंटची किंमत 279 यूरो (जवळपास 24,000 रुपये) आणि 6GB + 128GB व्हेरियंटची किंमत 329 यूरो (जवळपास 28,300 रुपये) आहे. वाचाः Mi 10T आणि Mi 10T Pro चे वैशिष्ट्ये दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी (1080x2440 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. दोन्ही फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर, 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः Mi 10T च्या रियरमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स दिला आहे. तर Mi 10T Pro च्या रियरमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिले आहे. वाचाः Mi 10T Lite या फोनमध्ये सुद्धा ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 4,820mAh ची बॅटरी दिली आहे. जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा क्वॉड कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cIr3eg

Comments

clue frame