नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या युजर्संना जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. वर्क फ्रॉम होम मुळे युजर्स जास्त प्लान्सच्या शोधात आहेत. ज्यात कमी किंमतीत जास्त बेनिफिट तसेच जास्त डेटा ऑफर केला जात आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन - आयडिया चे काही प्लान्समध्ये माहिती देत आहोत. ज्यात रोज ४ जीबी रॅम पर्यंत डेटा सोबत फ्री कॉलिंग ऑफर केली जात आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची किंमत ३०० रुपयांपेक्षा कमी आहे. वाचाः वोडाफोन-आयडियाचे २९९ रुपयांचा प्लान वोडाफोन-आयडिया म्हणजे Vi आपल्या युजर्सला २९९ रुपयांचा जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळत आहे. सध्या या प्लानमध्ये डबल डेटा ऑफर केला जात आहे. आता या प्लानमध्ये रिचार्ज करणाऱ्या युजर्संना रोज ४ जीबी डेटा मिळत आहे. हा प्लान अनलिमिटेड फ्री कॉलिंग बेनिफिटसोबत येत आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह या प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस मिळत आहेत. वाचाः एअरटेलचा २९८ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये तुम्हाला रोज २ जीबी डेटा मिळतो. २८ दिवसांच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये देशात कुठेही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जात आहे. रोज १०० एसएमएस ऑफर मिळते. या प्लानमध्ये एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला फास्ट टॅग खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. वाचाः रिलायन्स जिओचा २४९ रुपयांचा प्लान जिओचा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमओध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्क्ससाठी या प्लानमध्ये १०००० एफयूपी मिनिट्स मिळतात. रोज १०० फ्री एसएमएस सोबत या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34bpO3i
Comments
Post a Comment