नवी दिल्लीः शाओमीचा नोट ९ स्मार्टफोनचा आज पुन्हा एकदा सेल आयोजित करण्यात आला आहे. ग्राहकांना हा फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन इंडिया आणि कंपनीची वेबसाइट वरून खरेदी करता येईल. १२ हजारांपेक्षा कमी किंमत असलेल्या या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा, 5020mAh ची बॅटरी आणि पंचहोल डिस्प्ले यासारखे फीचर्स दिले आहेत. फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 22.5W फास्ट चार्जिंग, रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्ड देण्यात आले आहे. वाचाः ची किंमत रेडमी नोट ९ फोन तीन व्हेरियंट मध्ये येतो. 4GB + 64GB मॉडल ची किमत ११ हजार ९९९ रुपये , 4GB + 128GB मॉडल ची किंमत १३ हजार ४९९ रुपये आणि 6GB + 128GB मॉडलची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये रेडमी नोट ९ स्मार्टफोन अँड्रॉयड १० आधारित MIUI 11 वर काम करतो. फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आणि रेजॉलूशन 1080x2340 पिक्सल आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ आणि स्पलॅश प्रूफ नॅनो कोटिंग दिली आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम, १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आणि मीडियाटेक हीलियोजी85 प्रोसेसर दिला आहे. यात 5020mAh ची बॅटरी दिली आहे. ती १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन रिव्हर्स चार्जिंग सुद्धा सपोर्ट करतो. वाचाः फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स मिळतो. व्हिडिओ कॉलिंगसाठी आणि सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iJ6yAg
Comments
Post a Comment