नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी आहे. जिओ आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळा डेटा लिमिट आणि वैधता प्लान ऑफर करीत आहे. ग्राहकांना रोज १ जीबी डेटा पासून ३ जीबी डेटा पर्यंत प्लानची निवड करू शकतात. काही युजर्संना जास्त वैधता हवी असते. तर काही युजर्संना जास्त डेटा हवा असतो. ३२९ रुपयांच्या जिओच्या प्लानमध्ये जास्त डेटा आणि जास्त वैधता आहे. म्हणजेच ८४ दिवसांची वैधता मिळते. वाचाः वाचाः रिलायन्स जिओचा ३२९ रुपयांचा प्लान हा कंपनीचा स्वस्त प्लान पैकी एक आहे. जिओच्या ३२९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात एकूण ६ जीबी डेटा मिळतो. हा डेटा विना लिमिटमध्ये दिला जातो. म्हणजेत युजर्सं एका दिवसात कितीही डेटा युज करू शकतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच १००० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जातात. वाचाः वाचाः वोडाफोन आणि एअरटेलचे प्लान जिओ प्रमाणे वोडाफोन आणि एअरटेल सुद्धा याप्रमाणे प्लान घेऊन आली आहे. परंतु, या प्लानची किंमत जास्त आहे. या दोन्ही कंपन्यांनी ३७९ रुपयांचा प्लान ऑफर करीत आहे. दोन्ही प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ६ जीबी डेटा आणि ८४ दिवसांची वैधता मिळते. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3at9ygX
Comments
Post a Comment