जिओचे ८४ दिवसांचे प्लान, अनलिमिटेड कॉलिंग आणि जबरदस्त डेटा

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी आवश्यकेनुसार वेगवेगळ्या कॅटेगरीतील प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. जिओकडे २ जीबी, ३ जीबी, १.५ जीबी आणि १ जीबी डेटा रोज मिळणारे प्लान आहेत. जिओच्या प्लानमध्ये वेगवेगळी वैधता असलेले प्लान आहेत. आज आम्ही या ठिकाणी तुम्हाला ८४ दिवसांची वैधता असलेल्या ३ प्लान संबंधी माहिती देत आहोत. जिओकडे ५९९, ५५५ आणि ९९९ जिओचे तीन प्लान आहेत. जे ८४ दिवसांची वैधतेसोबत येते. वाचाः ५९९ रुपयांचा जिओ प्लान जिओकडे सध्या ५९९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा म्हणजेच एकूण १६९ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणाऱ्या डेटाची लिमिट संपल्यानंतर युजर्सना 64Kbps स्पीडने इंटरनेट मिळते. या पॅकमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड आणि जिओ वरून दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ३ हजार मिनिट्स मिळतात. जिओ ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री देते. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री देते. वाचाः ५५५ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या पॅकमध्ये रोज १.५ जीबी डेटा या प्रमाणे १२६ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणाऱ्या हाय स्पीडच्या डेटाची लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना 64Kbps स्पीडने डेटाचा वापर करता येतो. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी जिओच्या या पॅकमध्ये ३ हजार कॉलिंग मिळते. जिओ ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळते. वाचाः वाचाः ९९९ रुपयांचा जिओ प्लान जिओच्या या ९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या पॅकमध्ये रोज ३ जीबी डेटा म्हणजेच २५२ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड 64Kbps स्पीड होते. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी ३ हजार मिनिट्स मिळतात. या पॅकमध्ये रोज १०० एसएमएस फ्री मिळतात. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l9XB4L

Comments

clue frame