Airtel चे दोन नवे प्लान, रोज ३जीबी डेटा, फ्री कॉलिंगसोबत हे खास बेनिफिट

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या युजर्संना आकर्षित करण्यासाठी नवीन-नवीन प्लान आणत आहेत. यात आता एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या पोर्टफोलियोला वाढवण्यासाठी ४४८ रुपये आणि ५९९ रुपयांचे दोन प्लान आणले आहेत. प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगसोबत अनेक अतिरिक्त बेनिफिट्स दिले जात आहे. वाचाः ४४८ रुपयांचा प्लान मिळणारे बेनिफिट्स २८ दिवसांच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा ऑफर केले जाते. रोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये देशभरात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, या प्लानमध्ये सर्वात जास्त खास बाब म्हणजे यात युजर्संना Disney+ Hotstar VIP चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट्स एअरटेलच्या म्हणण्यानुसार, डिज्नी प्लस हॉटस्टार चे फ्री सब्सक्रिप्शन सोबत येते. या प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य बेनिफिट्समध्ये रोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानच्या सब्सक्रायबर्सला देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करु शकता. तसेच ५६ दिवसांच्या वैधतेच्या या प्लानध्ये रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. वाचाः वाचाः जिओच्या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार फ्री रिलायन्स जिओच्या आपल्या ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. जिओचा हा प्लान २८ दिवसांचा आहे. यात रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते. रोज ३ जीबी डेटा ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये जिओ ते जिओ वर अनलिमिटेड मिळते. दुसऱ्या नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी यात १ हजार मिनिट्स मिळते. कंपनी या प्लानवर खास ऑफर देत आहे. या ऑफर मध्ये या प्लानवर ६ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EeAbtT

Comments

clue frame