बीजिंग : मालकीचे चीनी संदर्भ काढून टाकण्याच्या उद्देशाने टीकटॉकचे मुख्यालय चीनच्या हलविण्याचा बाइटडान्स कंपनीचा विचार आहे. सध्या हे मुख्यालय बीजिंगमध्ये आहे. भारत, अमेरिका अशा प्रमुख देशांनी बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड होण्याची शक्यता आहे. जगातील वेगवेगळ्या शहरांचा विचार सुरू आहे, पण ती कोणती हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
काय आहे पार्श्वभूमी?
मुळात भारताने चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनमध्ये अनेक आयटी कंपन्यांची मुख्यालये हलविण्याचा निर्णय घेण्याची चर्चा सुरू झाली. भारत-चीन सीमेवरचा तणाव या भारताच्या निर्णयाला कारणीभूत ठरला होता. भारतात तर चीन विषयी रोष आहेच. पण, जगभरात कोरोना व्हायरसमुळे चीनची मोठ्या प्रमाणावर नाचक्की झाली आहे. विशेषतः कोरोनाच्या जगभरातील परिस्थितीला चीनच जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेकडून वारंवार करण्यात आलाय.
हे वाचा - ...आणि ट्विटरवर सुरू झाला पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा ट्रेंड
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच सार्वजनिक ठिकाणी कोरोना व्हायरसचा उल्लेख चायनीज् व्हायरस असा केला होता. यासगळ्याचा परिणाम चीनच्या अर्थकारणावर होताना दिसत आहे. बाइटडान्स कंपनीने ब्रिटिश सरकारशी चर्चा सुरू केल्यामुळं ब्रिटनमध्येच मुख्यालय हालविण्यात येईल, अशी दाट शक्यता व्यक्त केली आत आहे. आतापर्यंत केवळ लंडनचीच चर्चा सुरू असल्यामुळं त्या शहरावरच शिक्कामोर्तब होईल, असं स्पष्ट दिसत आहे.
हे वाचा - जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार
ब्रिटिश सरकारबरोबर चर्चा फिस्कटली?
टीकटॉकने यंदा कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती केली आहे. यात मुख्य कार्यवाह म्हणून केव्हिन मायर यांना वॉल्ट डिस्नी कंपनीतून फोडण्यात आले. मायर अमेरिकेतून कामकाज पहात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटिश सरकारशी चर्चा सुरु आहे, पण अद्याप निर्णय झालेला नाही. एका दैनिकाने ही चर्चा फिसकटल्याचेही वृत्त दिले. टीकटॉकतर्फे मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. लंडनमधील कर्मचारीवर्ग मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचा तसेच चीनबाहेरील महत्त्वाच्या इतर ठिकाणी हेच होण्याची अपेक्षा आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2ZJqdsA
Comments
Post a Comment